प्रभासच्या “आदिपुरुष’ या आगामी सिनेमाची रिलीज डेट फायनल झाली आहे. हा बिग बजेट सिनेमा 2022 साली रिलीज होणार आहे. स्वतः प्रभासनेच ही माहिती दिली आहे. त्याने “आदिपुरुष’चे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. हा सिनेमा 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार असल्याचेही प्रभासने म्हटले आहे. या सिनेमाची कथा रामायणाच्या कथेवर आधारलेली आहे.
त्यामध्ये प्रभास आदिपुरुषाच्या रोलमध्ये तर सैफ अली खान लंकेशच्या रोलमध्ये दिसणार आहे. सोशल मिडीयावर रिलीज झालेल्या “आदिपुरुष’च्या पोस्टरमध्ये सैफ रावणाऱ्या गेट अपमध्ये आणि चक्क दहा तोंडे असलेला दिसतो आहे. “आदिपुरुष’ एक बिग बजेट आणि मेगास्टार सिनेमा असणार आहे.
त्यामध्ये प्रत्यक्ष रामायणातील किती भाग असेल आणि बॉलिवूडचा मसाला किती असेल, हे आताच सांगता येणार नाही. त्याची निर्मिती 3-डी असणार आहे. त्यामुळे त्या सिनेमाबद्दल खूपच अपेक्षा आहेत. या सिनेमाचे डायरेक्शन ओम राउत करणार आहे, तर टी-सिरीजच्या भूषण कुमार याची निर्मिती करणार आहे. हिंदी व्यतिरिक्त, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळममध्येही रिलीज केले जाणार आहे.