नांदेड – नांदेड शहरातील एका कॉफी शॉपमध्ये अश्लील उद्योग सुरू असल्याची बाब तेथील छाप्यावरून उघड झाली आहे. प्रत्यक्षात तेथे कॉफी शॉप नव्हताच. त्याऐवजी तेथे अंधुक प्रकाशात तरुण तरुणींचे अश्लील चाळे सुरू असत.
संबंधित दाम्पत्यांना पैसे घेऊन तेथे असले उद्योग करण्यासाठी प्रवेश दिला जात असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. तेथे रितसर वेश्याव्यवसायही केला जात असे.
पोलिसांनी या छाप्याच्यावेळी पाच तरुण आणि एका अल्पवयीन तरुणीला अटक केली आहे. या कॉफी शॉपमध्ये कॉफी बनवण्याचे कोणतेही साहित्य उपलब्ध नव्हते. तसेच तेथे जे साहित्य उपलब्ध होते तेही वापरात नव्हते असे पोलिसांच्या छाप्याच्यावेळी दिसून आले आहे. म्हणजेच तेथे कॉफी शॉपच्या नावाखाली केवळ अनैतिक धंदेच सुरू होते.