पिंपरी (प्रतिनिधी) – चिंचवडगावातील लोकमान्य हॉस्पिटल जवळील असलेल्या सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झालेली आहे. कामानिमित्त बाहेर असणाऱ्या प्रवासी पुरुष व महिलांसाठी महापालिकेकडून हे शौचालय बांधले आहे, परंतु त्याची सध्या बिकट अवस्था झालेली दिसून येत आहे, चिंचवडगावातील लोकमान्य हॉस्पिटल जवळील असलेल्या शौचालयात जाण्यास नागरिक नकार देत आहेत.
लोकमान्य हॉस्पिटल जवळील शौचालयात नळ नसल्याने पाणी नागरिकांच्या अंगावर येत असल्याने त्या शौचालयात नागरिक जात नसल्याचे दिसून येत आहे. महापालिका चौकात असलेल्या सार्वजनिक प्रशासनाने स्वच्छतागृहाची शौचालयाची दुरवस्था झाली आहे. दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. शौचालयात नळ गायब झाले आहेत.
त्यामुळे यातून पाण्याचा अपव्यय होत असून, त्यानंतर शौचालयात पाणीच नसते. हा परिसर मोठ्या लोकसंख्येचा आहे; तसेच बाजारपेठही आहे. यामुळे या रस्त्यावरून येणार्या – जाणाऱ्या वाहनांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शौचालयाची दुरवस्था झाली असल्याने येथील नागरिक, कामगार, व्यावसायिक, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांची मोठी कुचंबणा होत आहे.