पाकिस्तानात पोलिओ पुन्हा डोके वर काढतोय !

इस्लामाबाद – जगभरातून पोलिओ रोगाचे पूर्ण उच्चाटन होत आले असताना पाकिस्तानात मात्र या रोगाने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून आले आहे. त्या देशात पोलिओच्या पुन्हा नऊ केसेस आढळून आल्या आहेत. त्यामुळे केवळ पाकिस्तान सरकारच नव्हे तर संपूर्ण जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्‍त केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की या रोगाचे पाकिस्तानातील अस्तित्व चिंता वाढवणारे आहे. तेथे पोलिओ लसीकरणालाच विरोध होणे ही बाब अधिक घातक आहे. पाकिस्तानच्या पंजाब आणि बलुचिस्तान प्रांतात नव्याने पोलिओचे रुग्ण आढळून आले असून त्यामुळे ही बालके पूर्णपणे अपंग झाली आहेत.

पंजाब प्रांतातील पाच मुले पोलिओमुळे अपंग बनली आहेत. सिंध प्रांतातही दोन पोलिओ रुग्ण बालके आढळून आली आहेत. आता जगात केवळ पाकिस्तान हाच देश असा आहे की जिथे पोलिओचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने त्यांना वारंवार सावधगिरीच्या सूचना दिल्या होत्या, पण त्याकडे त्यांनी गांभीर्याने पाहिले नाही.

तेथील काही इस्लामिक कट्टरपंथीयांच्या संघटनांनी पोलिओ लसीकरण मोहीमच इस्लामविरोधी ठरवून या लसीकरण पथकातील काही जणांवर हल्ले करून त्यांना ठार मारल्याच्या घटना घडल्या आहेत. पाकिस्तानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने यंदा देशभरात एकूण 72 पोलिओ केसेस आढळून आल्याचे नमूद केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.