नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत एका ३९ वर्षीय व्यक्तीने फेसबुकवर लाईव्ह करत आपल्या हाताची नस कापून घेतल्याची घटना समोर आली आहे. मात्र सोशल मिडिया फेसबुक कंपनीने वेळेतच दिल्ली पोलिसांना सतर्क केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पश्चिम दिल्लीतील द्वारका निवासी सोहम लालने (नाव बदलेल) शेजाऱ्यांशी झालेल्या वादातून हातावर धारदार शस्त्राने वार केले. हे करत असताना त्याने फेसबुक लाईव्ह केलं. हे घडत असताना सीवआयपैडचे डीसीपी अन्येश राय यांना फेसबुकच्या अमेरिकेतील कार्यालयातून फोन आला. त्यात त्यांनी सांगितलं की, दिल्लीत एक व्यक्ती फेसबुकवर लाईव्ह करून आत्महत्येचा प्रयत्न करत आहे. याचा लाईव्ह व्हिडीओ सुरू आहे.
ही माहिती मिळाल्यानंतर प्रभारी उपनिरीक्षक अमित कुमार यांनी घटनास्थळ शोधून काढलं. त्यानंतर त्या व्यक्तीचा शोध घेतला. त्यावेळी संबंधित व्यक्ती पायऱ्यांवर वाईट स्थितीत आढळून आला. त्याने हाताची नस कापलेली होती. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची तब्येत आता स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
सोहम लाल याला दोन मुलं आहेत. तर पत्नीचं २०१६ मध्ये निधन झालं होतं. सोहम लाल याची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यातच शेजाऱ्यांशी वाद झाला. यातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.
सायबर प्रतिबंध आणि संशोधन तथा अंतरराष्ट्रीय सोशल मीडिया यांच्यातील समन्वयाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक कंपनीने पोलिसांना महत्त्वपूर्ण सूचना दिली. त्यामुळे सोहम लाल याच जीव वाचू शकला.