पिंपरी -पोलिसांची प्रकृती तंदुरूस्त राहावी, यासाठी सायकलचे वाटप केले आहे. मात्र पावसाळ्यात या सायकल अडगळीत गेल्या होत्या. गुरुवार (दि. 31) पासून पुन्हा सायकलवर गस्त घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले आहेत.तसेच ज्या पोलीस ठाण्यांकडून सायकलवरून गस्त घालण्यात येणार नाही, त्यांच्याकडून खुलासा घेतला जाईल, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रकृती उत्तम राहावी यासाठी पोलीस आयुक्तांकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. पोलिसांच्या प्रकृतीची माहिती मिळावी यासाठी प्रत्येक पोलिसांला डिजिटल वॉच देण्यात आले आहे. या वॉचवरून पोलिसांचा रक्तदाब, ऑक्सिजनचे प्रमाण, ताप, ह्रदयाचे ठोके इत्यादीबाबत माहिती मिळते. तसेच याच घड्याचा वापर करीत पोलिसांच्या तंदुरुस्तीकरिता चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी बक्षिसेही जाहीर केली आहेत.
पोलिसांनी वाहनांऐवजी सायकलवरून गस्त घालावी, यासाठी पोलिसांना सायकलींचे वाटपही केले आहे. मात्र या सायकलला मडगार्ड नसल्याने पावसाळ्यात या सायकल पोलिसांनी अडगळीत ठेवून दिल्या. हिवाळ्यातही या सायकल गस्तीसाठी बाहेर काढल्या नाहीत. याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बिनतारी संदेशवरून सर्व पोलीस ठाण्यांना सायकलवरून गस्त घालण्याचे आदेश दिले. सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत दिवसपाळीतील कर्मचारी सायकलवरून गस्त घालतील. तसेच रात्रपाळीसाठी आलेले कर्मचारी आठ ते दहा वाजेपर्यंत गस्त घालतील. याशिवाय पहाटे चार ते सहा वाजताच्या दरम्यान पोलिसांचे “गुड मॉर्निंग’ पथकही सायकलवरून परिसरात गस्त घालेल, असे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. यामुळे