मुंबई – शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये सुरू असलेले आरोपसत्र सुरूच असून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केले. यावेळी सोमय्या यांनी त्यांना सांताक्रुझ पोलिसांनी नोटीस बजावल्याचे ट्विट केले. पण नोटीशीचे कारण मात्र भलतेच सांगितले. यामुळे सोशल मीडियावर सोमय्या यांच्यावर टीका होत आहे.
सोमय्या यांना सांताक्रूझ पोलिसांची नोटीस आली, हे खरे आहे. मात्र ही नोटीस त्यांना कलम 188 अंतर्गत करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बजावण्यात आली आहे. त्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 15 दिवसांत पोलीस ठाण्यात हजर राहून स्पष्टीकरण द्या, अन्यथा कारवाई केली जाईल, असे या नोटीशीत सांगण्यात आले आहे.