Virat Kohli : रनमशीन कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; ICC कडून मिळाला ‘हा’ मोठा पुरस्कार

ICC Men’s ODI Player of the Year 2023 :- भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली सध्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धा खेळण्यासाठी अमेरिकेत आहे. अमेरिकेत आयसीसीने कोहलीला आयसीसी ‘२०२३ सालचा एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू या या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
कोहलीला हा पुरस्कार गेल्या वर्षीच जाहीर होता, मात्र त्याला अमेरिकेत या पुरस्काराची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. आयसीसीने पुरस्कारासोबतचा कोहलीचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Virat Kohli with ICC ODI Cricketer Of The Year award. 🐐🇮🇳 pic.twitter.com/f4Zw7axvPl
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 2, 2024
विराट कोहलीने गेल्या वर्षी आपल्या बॅटने शानदार प्रदर्शन केले होते. विराटने २७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६ शतके आणि ८ अर्धशतकांसह एकूण १,३७७ धावा केल्या होत्या. २०२३ साली कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद १६६ धावा होती. एवढेच नाही तर कोहलीने एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. विराटने एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत ११ सामन्यात ७६५ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्याच्या नावावर ३ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे.
या स्पर्धेतील त्याची सर्वोत्तम धावसंख्या ११७ धावा होती. या कामगिरीच्या जोरावर कोहली या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आणि विश्वकरंडक स्पर्धांच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. २००३ सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत सचिनने ६७३ धावा केल्या होत्या. याशिवाय कोहलीने सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय सामन्यांच्या कारकीर्दीत ४९ शतकांचा विक्रम मागे टाकत या ५० वे शतक फटकावले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कोहलीने हा पराक्रम केला होता.





