जालना – जालन्यात मराठा आंदोलकांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं. या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. आंदोलनासाठी उभारण्यात आलेल्या मंडपात पोलीस घुसले आणि त्यांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचे समजते.आंदोलकांकडून दगडफेक झाल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे.
अंतरवाली सराटी गावात मराठा आक्रोश मोर्चाचं आरक्षणासाठी उपोषण सुरू होतं. तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. यामुळे आंदोलनस्थळी गोंधळ उडाला. लाठीचार्जची बातमी समोर येताच राजकीय वर्तुळातून देखील संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
आंदोलकांवर लाठीचार्ज करतानाचे पोलिसांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावेळी आंदोलकांकडून दगडफेक झाल्याचा आरोप देखील पोलिसांकडून करण्यात आला आहे. मात्र यानंतर आंदोलनकडून संताप व्यक्त केला जात आहे.