निमसाखर – सोशल मीडियाच्या विळख्यात आजची तरूणाई जखडली जात आहे. ही पिढी मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करीत आहे. शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळाकडे तरुणाईचा ओढा निर्माण होणे गरजेचे आहे. मात्र, या सोशल मीडियाला फाटा देत निमसाखर येथील तरुणांकडून मैदानी खेळून इतर तरुणांना मार्गदर्शक ठरत आहे.
सध्या टीव्हीबरोबरच सोशल मीडियाच्या युगात मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. आजची तरुणाई मोबाईलमध्ये बुडाली आहे. त्यांना भान राहिले नाही. निमसाखर परिसरात यापूर्वी अनेक मैदानी खेळ खेळले जात असत. चाळीस वर्षांपूवी निमसाखर संघांनी राज्यस्तरीय सामन्यापर्यंत मजल मारली होती. मात्र नंतरच्या काळात या खेळाला उतरती कळा लागली. कबड्डीसाठी आजही निमसाखरचे नाव “उत्कष्ट क्लब’च्या माध्यमातून अनेक जिल्ह्यात मोठ्या आदराने घेतले जाते. ही परंपरा आजही जोपासली जात आहे. सध्या शारीरिक व मानसिक कुशाग्रतेचा महाराष्ट्राचा समजला जाणाऱ्या ग्रामीण भागातील सुरफाट हा खेळ मुले खेळत आहेत.