- नव्याने दाखल झालेल्यांनाही नियुक्ती; राजकीय दबावाला “कात्रजचा घाट’
पिंपरी – गेल्या अनेक दिवसांपासून शहर पोलीस आयुक्तालयातील रखडललेल्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. राजकीय दबावाला भिक न घालता त्यांनी पोलीस दलात बाहुबली ठरू पाहणाऱ्या व वादग्रस्त ठरलेल्या अधिकाऱ्यांना कात्रजचा घाट दाखवित अनपेक्षित बदल्या केल्या आहेत. विशेष म्हणजे शहरात नव्याने दाखल झालेल्या पोलीस निरीक्षकांपैकी एकालाही “वरिष्ठ’ बनविण्यात आलेले नाही.
पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त म्हणून कृष्णप्रकाश यांनी कार्यभार सांभाळल्यानंतर ते बदल्या करणार याबाबत चर्चा रंगली होती. मात्र त्यांनी सुरुवातीला बदल्यांऐवजी कायदा व सुव्यवस्थेला महत्त्व देत शहरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यास प्राधान्य दिले. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये शहरात चार नवीन सहायक पोलीस आयुक्त दाखल झाले होते. तर 13 पोलीस निरीक्षक, चार सहायक निरीक्षक आणि 17 उपनिरीक्षकांची नियुक्तीही करण्यात आली होती.
हे सर्वजण गेल्या दहा ते बारा दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. शुक्रवारी सायंकाळी नव्याने दाखल झालेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसह सध्या कार्यरत असलेल्या 17 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या कृष्णप्रकाश यांनी केल्या आहेत. नव्याने दाखल झालेल्या एकाही पोलीस निरीक्षकाला वरिष्ठ म्हणून बसविण्यात आले नाही. तर राजकीय दबावातून चांगले पोलीस ठाणे मिळवू पाहणाऱ्यांनाही आयुक्तांनी धक्का दिला असून पुर्वीच्या आयुक्तांच्या काळात बाहुबली बनलेल्या काही अधिकाऱ्यांची कमी महत्त्वाच्या ठिकाणी उचलबांगडी करण्यात आली आहे. जर काही जणांना थेट “साईड ट्रॅक’ करत नव्या दमाच्या अधिकाऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. आयुक्तांच्या या निर्णयाबद्दल पोलीस दलात संमिश्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत.
“प्रभात’च्या वृत्ताची दखल
“शहरातील 34 पोलीस अधिकारी नियुक्तीच्या प्रतिक्षेत’ या शीर्षकाखाली शुक्रवारी (दि. 13) दै. प्रभातमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. या वृत्तीची दखल घेत पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी शुक्रवारी सायंकाळीच पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात यापूर्वी पोलीस निरीक्षकाचे नाव सध्याची नेमणूक नवीन नेमणुकीचे ठिकाण
भास्कर जाधव नव्याने हजर दरोडा विरोधी पथक
उत्तम तांगडे गुन्हे शाखा युनिट एक खंडणी विरोधी पथक
रामदास इंगवले नव्याने हजर गुन्हे शाखा युनिट पाच
डॉ. संजय तुंगार नव्याने हजर सायबर व तांत्रिक विश्लेषण शाखा
बालाजी सोनटक्के म्हाळुंगे पोलीस चौकी गुन्हे शाखा युनिट एक
विठ्ठल कुबडे चाकण वाहतूक विभाग सामाजिक सुरक्षा विभाग
शिवाजी गवारे भोसरी वाहतूक विभाग व.पो.नि. भोसरी एमआयडीसी पो. ठाणे
ज्ञानेश्वर साबळे नियंत्रण कक्ष व.पो.नि. आळंदी पोलीस ठाणे
बाळकृष्ण सावंत गुन्हे शाखा युनिट पाच व.पो.नि. हिंजवडी पोलीस ठाणे
मोहन शिंदे गुन्हे शाखा युनिट चार व.पो.नि. दिघी पोलीस ठाणे
रवींद्र जाधव व.पो.नि. चिंचवड पोलीस ठाणे नियंत्रण कक्ष
सुधाकर काटे सायबर कक्ष व.पो.नि. चिंचवड पोलीस ठाणे
अरविंद पवार नव्याने हजर म्हाळुंगे पोलीस चौकी
जितेंद्र कदम नव्याने हजर भोसरी पोलीस ठाणे (गुन्हे)
प्रदीप पाटील नव्याने हजर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे (गुन्हे)
विलास सोंडे नव्याने हजर निगडी पोलीस ठाणे (गुन्हे)
प्रकाश जाधव आळंदी पोलीस ठाणे (गुन्हे) दिघी पोलीस ठाणे (गुन्हे)
संतोष पाटील नव्याने हजर वाकड पोलीस ठाणे (गुन्हे)
दिलीप भोसले तळवडे वाहतूक विभाग चिखली पोलीस ठाणे (गुन्हे)
सुनील गोडसे नव्याने हजर चाकण वाहतूक विभाग
राजेंद्र कुंटे व.पो.नि. एमआयडीसी भोसरी पिंपरी वाहतूक विभाग
सतीश नांदुरकर भोसरी पोलीस ठाणे (गुन्हे) सांगवी वाहतूक विभाग
बाळासाहेब तांबे नव्याने हजर निगडी वाहतूक विभाग
सुधीर अस्पत खंडणी/दरोडा विरोधी पथक भोसरी वाहतूक विभाग
वैभव शिंगारे नव्याने हजर तळवडे वाहतूक विभाग
प्रसाद गोकुळे विशेष शाखा गुन्हे शाखा युनिट चार
विवेक लावंड व.पो.नि. दिघी पोलीस ठाणे कल्याण शाखा
रवींद्र चौधर व.पो.नि. आळंदी पोलीस ठाणे विशेष शाखा
अरूण ओंबासे निगडी वाहतूक विभाग नियंत्रण कक्ष
राजेंद्रसिंग गौर नव्याने हजर नियंत्रण कक्ष