लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते. अश्विन अमावास्येला प्रदोष काळी लक्ष्मीपूजन केले जाते. आज १४ नोव्हेंबर २०२० रोजी लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. नेमके केव्हा लक्ष्मीपूजन करावे? लक्ष्मी देवीच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता?
सोनपावलांनी लक्ष्मीचं आगमन. घरोघऱी लक्ष्मीपूजनाची लगबग. रात्री ८.३२ पर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. आज लक्ष्मीपूजन. पहाटे चंद्रोदयकाली आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि प्रदोषकाली आश्विन अमावास्या आहे. काय आहे आजचा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त, याची अनेकांना उत्सुकता असते. याबद्दल सांगतायत खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण सांगतात दिवाळीत लक्ष्मीपूजन महत्वाचे आहे.
दरम्यान जागतिक महामारीमुळे अनेकांनी दिवाळी साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र घरच्याघरी लक्ष्मीपुजन करुन या संकटातून मुक्त कर, अशी लक्ष्मीकडे मागणी करणार आहे.