पिंपरी, (प्रतिनिधी) – इन्स्टिट्यूट फॉर सोशल रिफॉर्मस अँड हाय एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने डॉ राजू पांचाळ यांना भारत सन्मान निधी पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथील दिल्ली विधानसभा या ठिकाणी संपन्न झाला .
दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल, सचिव राजकुमार अग्रवाल, आयएसआरएचइचे अध्यक्ष डॉ अतुल कुमार शर्मा, सचिव रेणू गुप्ता, रामनिवास गोयल उपस्थित होते. डॉ राजू पांचाळ यांनी पत्नी डॉ.जागृती, पांचाळ,कन्या इच्छा पांचाळ यांच्यासह स्वीकारला डॉ राजू पांचाळ हे गेली १५ वर्षापासून ताथवडे येथील राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
या व्यतिरिक्त त्यांनी दीडशेहून अधिक शाळा महाविद्यालयातील चाळीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास का? व कसा करावा? स्वतः विकसित केलेल्या विषयावर ते मार्गदर्शन करीत आहे. या पुरस्काराबद्दल राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत, राजर्षी शाहू इंजीनियरिंग कॉलेजचे संचालक डॉ. राकेश जैन,उपसंचालक डॉ.अविनाश देवस्थळी, ताथवडे शैक्षणिक संकुलाचे संचालक प्रा सुधीर भिलारे,रवी सावंत यांनी अभिनंदन केले.