पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच कै.चंद्रकांत साठे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या 20 षटकांच्या स्पर्धेत सतीश दरेकर इलेव्हन संघाने बाजी मारली. इलेव्हन संघाने मावेरीकस क्रिकेट अकॅडमीच्या संघावर 14 धावांनी विजय मिळवून कै.चंद्रकांत साठे चषक व रुपये 25 हजाराचे पारितोषिक जिंकले.
ही स्पर्धा सिल्वर क्रिकेट अकॅडमी, परंडवाल क्रिकेट अकॅडमी व अटीवर क्रिकेट अकॅडमी मैदानावर घेण्यात आली. मावेरीकस क्रिकेट अकॅडमी संघ उपविजेता ठरला. तर एसएसए ओपन टीम संघाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. पारितोषक वितरण माजी महापौर आझम पानसरे, माजी अतिरिक्त आयुक्त रोहिदास कोंडे, शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, लायन राकेश जैन, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक अप्पा ढेरे, शहर क्रिकेट असोसिएशनचे सचिव राजू कोतवाल, खजिनदार संजय शिंदे, सहसचिव दिलीपसिंह मोहिते, नरेंद्र कदम, मुकेश गुजराथी, हर्ष नायर, हरी देशपांडे, युसुफ आदींच्या हस्ते झाले. स्पर्धेचे आयोजन राजू कोतवाल, मुकेश गुजराथी, संजय शिंदे, नरेंद्र कदम, प्रदीप वाघ यांनी केले.लसूत्रसंचालन प्रदीप वाघ, प्रास्ताविक राजू कोतवाल यांनी केले. संजय शिंदे यांनी आभार मानले.
या खेळाडूंचा गौरव
उत्कृष्ट फलंदाज म्हणून अनिश गायकवाड (मावेरीकस क्रिकेट अकॅडमी), उत्कृष्ट गोलंदाज प्रशांत तेलंगे (एसएसए ओपन टीम), मॅन ऑफ द सिरीज अनिश गायकवाड (मावेरीकस क्रिकेट अकॅडमी), उत्कृष्ट यष्टीरक्षक रुद्रव शिरभाते (किरण क्रिकेट अकॅडमी,) उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आदित्य एकशिंगे (एसएसए ओपन टीम) यांचा सन्मान करण्यात आला.