ओडिशात सत्ताबदल! मोहन मांझी आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ; जाणून घ्या राजकीय प्रवास…

Odisha CM Oath Ceremony| ओडिशामध्ये यंदा भाजप सत्ता स्थापन करणार आहे. ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार कामगिरी करत नवीन पटनायक यांना सरकारमधून जाण्यास भाग पाडले. पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बीजू जनता दलाचे सरकार सलग दोन दशकांपेक्षा अधिक काळ सत्तेवर होते.
आता येथे भाजप सरकार स्थापन करणार असून आज 12 जून रोजी शपथविधी सोहळा होणार आहे. ओडिशा राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी भारतीय जनता पार्टीकडून मोहन मांझी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत केव्ही सिंग देव आणि प्रवती परिदा हे देखील राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. माझी यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी अडीच वाजता पोहोचतील. सायंकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे.
यासाठी भुवनेश्वरच्या जनता मैदानाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. तसेच या सोहळ्याला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रतिष्ठित व्यक्ती शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. ओडिशातील विधिमंडळ पक्षनेतेपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने पक्षाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह आणि भूपेंद्र यादव यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. यावेळी 11 जून रोजी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मांझी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.
मोहन मांझी यांच्या खांद्यावर ओडिशाची धुरा
खुद्द नवीन पटनायक 2000 पासून राज्याचे मुख्यमंत्री होते. एकूण 24 वर्ष 98 दिवस ते या पदावर होते. आता मोहन मांझी यांच्या खांद्यावर भाजपने ओडिशाची धुरा सोपवली आहे. मोहन मांझी दलित समाजातील असून या समुदायात आपली पकड अधिक घट्ट करण्यासाठी भाजपने त्यांची निवड केली आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या क्योंझर विधानसभा मतदारसंघातून मांझी यांचा विजय झाला आहे. 52 वर्षीय मांझी यांनी चार वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. Odisha CM Oath Ceremony|
मांझी यांच्यावर भारतीय जनता पक्षाने विश्वास करत त्यांना ओडिशाचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. याभारतीय जनता पक्ष 147 पैकी 78 जागा जिंकून ओडिशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. दुसरीकडे बिजू जनता दलाने 51 जागा जिंकल्या.
राजकीय कारकिर्दीला सरपंच म्हणून सुरुवात
मोहन चरण मांझी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सरपंच म्हणून सुरुवात केली. 1997 ते 2000 दरम्यान त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. 1997 मध्ये त्यांना भाजप ओडिशा आदिवासी मोर्चाच्या सचिवपदाची जबाबदारी मिळाली. आदिवासी नेते मोहन मांझी यांनी विधानसभा निवडणुकीत केओंझर मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत त्यांनी बिजू जनता दलाच्या मीना मांझी यांचा 11,577 मतांनी पराभव केला. 52 वर्षीय भाजप नेत्याचा विधानसभा निवडणुकीतील हा चौथा विजय आहे. ते 2000 मध्ये केओंझर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. यानंतर 2004, 2019 आणि आता 2024 मध्येही त्यांनी क्योंझर मतदारसंघातून विजय मिळवला. Odisha CM Oath Ceremony|
हेही वाचा:





