पिंपरी – महावितरणकडून पुणे परिमंडलमध्ये सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांच्या व डबल पोल स्ट्रक्चरच्या 250 ठिकाणी वीजसुरक्षेसाठी फायबर रीइन्फोर्स प्लॅस्टिकपासून तयार केलेले नव्या तंत्राचे संरक्षक जाळ्यांचे कुंपण प्रायोगिक तत्त्वावर लावण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड शहरासह मुळशी, वेल्हे, हवेली, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील रोहित्र व डबल पोल स्ट्रक्चरच्या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर प्लॅस्टिकचे जाळीदार कुंपण लावण्यात येत आहे.
पारंपरिक लोखंडी जाळीदार कुंपणाच्या तुलनेत या फायबर प्लॅस्टिकचे कुंपण फायदेशीर आहे. ते पिंपरी चिंचवड शहरासह मुळशी, वेल्हे, हवेली, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील रोहित्र व डबल पोल स्ट्रक्चरच्या 250 ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर लावण्यात येत आहे.
फायबर प्लॅस्टिकच्या सुमारे सात-आठ फुट उंचीच्या जाळीदार संरक्षक कुंपणावर कोणताही परिणाम होत नाही. सडत नाही तसेच आगीने जळत नाही. त्यामुळे महत्वाच्या रोहित्र व डबल पोल स्ट्रक्चरच्या 250 ठिकाणांची निवड करण्यात आली असून तेथे प्रायोगिक तत्त्वावर ते लावण्यात येत आहे.
“याला’ बसेल आळा
महावितरणचे विविध ठिकाणी रोहित्र आणि डबल पोल स्ट्रक्चर आहेत. तेथे वीजसुरक्षेच्या दृष्टीने परंपरागत लोखंडी जाळ्यांचे संरक्षक कुंपण लावण्यात आले आहे. पावसामुळे ते कुंपण गंजणे, सडणे, तुटणे, वाकणे, मोडतोड करून चोरीद्वारे भंगारात विकणे आदी प्रकार होत आहेत. त्याला आता आळा बसेल.