पिंपरी – नायलॉन मांजा विक्रीप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एका दुकानदारावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई शनिवारी (दि. 13) दुपारी ज्योतिबानगरमधील शीतल प्रोविजन अँड जनरल स्टोअर या दुकानात करण्यात आली.
विजय रामेश्वर गायकवाड (वय 37, रा. ज्योतिबानगर, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार आशिष बोटके यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय गायकवाड याने त्याच्या दुकानामध्ये नायलॉन मांजा विक्रीसाठी ठेवला. याबाबत माहिती मिळाली असता खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत विजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.
दरम्यान, याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 31 डिसेंबर 2020 रोजी नायलॉन मांजाच्या विक्रीवर प्रतिबंध करण्याचे आदेश दिले होते. तसेच मागील काही दिवसांपूर्वी औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांना याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.