पिंपरी, दि. 15 (प्रतिनिधी) -पिंपरी चिंचवड न्यायालय, पुणे जिल्हा विधी प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 12) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पिंपरी न्यायालयात 137, आकुर्डी न्यायालयात 680 खटले निकाली काढण्यात आले. यातून दोन कोटी दोन लाख 79 हजार 295 रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष दिनकर बारणे होते. पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. वानखेडे, आर. एम. गिरी, पी. सी. फटाले, मोरे यांचा सत्कार करण्यात आला. लोक न्यायालयाच्या पॅनल ऍडव्होकेट म्हणून ऍड. बिनी थॉमस, ऍड. प्रफुल्लता निगडे, ऍड. शुभा पिल्ले, ऍड. आशा भामरे, ऍड. गणेश कनकदंडे, ऍड. मानसी उदासी, ऍड. सुरेखा दफळ, ऍड. पूजा शिंदे यांनी काम पाहिले. पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. सुनील कडूसकर, ऍड. विजय शिंदे, सर्व सरकारी वकील तसेच बहुसंख्य वकील व पक्षकार उपस्थित होते.
आकुर्डी न्यायालयात दाखलपूर्व पाणीपट्टीची 2293 प्रकरणे ठेवण्यात आली, त्यातील 104 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये 27 लाख 76 हजार 552 रुपये महसूल जमा झाला. दाखलपूर्व मिळकतकरबाबत 3656 प्रकरणे ठेवली होती. त्यातील 576 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये एक कोटी 15 लाख 54 हजार 717 रुपयांचा महसूल जमा झाला. पिंपरी न्यायालयात 137 खटले निकाली काढण्यात आले. त्यात 59 लाख 48 हजार 26 रुपये महसूल जमा
झाला आहे.
महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांनी मेडिटेशन ट्रेनिंगसाठी ऍड. अतिश लांडगे यांची निवड झाल्याबद्दल पिंपरी न्यायालयातील न्यायाधीशांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ऍड. लांडगे यांचा पिंपरी चिंचवड ऍडव्होकेटस बार असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष ऍड. सचिन थोपटे व कमिटी यांनी सन्मान केला. न्यायधीश मोरे यांनी नागरिकांना लोक अदालत व त्याचे महत्त्व सांगितले. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेटस् बार असोसिएशनचे तत्कालीन सचिव ऍड. निखिल बोडके यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. मंगेश खराबे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेटस बार असोसिएशनचे सन 2021-22 च्या कार्यकारिणीचे अध्यक्ष ऍड. सचिन थोपटे, उपाध्यक्ष ऍड. गौरव वाळुंज, सचिव ऍड. निखिल बोडके, महिला सचिव ऍड. प्रियंका सुरवसे, सहसचिव ऍड. सुनील रानवडे, खजिनदार ऍड. अनिल पवार, ऑडिटर ऍड. गोरख मकासरे, सदस्य ऍड. मंगेश खराबे, ऍड. संतोषी काळभोर, ऍड. सारिका मोरे, ऍड. ऐश्वर्या शिरसाठ, ऍड. स्नेहा कांबळे, ऍड. महेश मासुळकर यांनी केले.