पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित २१ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गुरूवार दि. ९ फेब्रुवारी रोजी पुण्यातील मुकुंदनगर येथील सकल ललित कलाघर येथे पार पडला. यावेळी पिफच्या ‘ रदार ‘ या चित्रपटाने अनेक पुरस्कार प्राप्त करत संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार प्राप्त करीत महोत्सवावर मोहोर उमटवली. तसेच यंदाचा प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बेल्जियम आणि फ्रान्स येथील ‘तोरी अँड लोकिता’ या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. तसेच अनेक चित्रपटांनीही वेगवेगळे पुरस्कार प्राप्त केले.
‘मदार’ चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश बदर पुरस्कार प्रदान नंतर आनंद व्यक्त केला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, हा चित्रपट बनवताना बऱ्याच गोष्टींचा विचार केला गेला. मुख्यतः संपूर्ण चित्रपट त्यांच्या स्वताच्या अनुभवावरून बनवण्यात आला आहे. ‘गदार’ चा अर्थ एखाद्यावर अवलंबून असणे होय. त्याचप्रमाणे शेतकरी वर्गाची शेती ही पूर्णपणे पाण्यावर अवलंबून असते त्यासाठी पाण्यासाठी ते कशाप्रकारे धडपड करत असतात याचे संपूर्ण चित्र या चित्रपटाद्वारे उलगडण्यात आले आहे. तसेच याद्वारे अनेक नवीन कलाकारांना सिनेमा सृष्टीत प्रवेश करण्यासाठी एक चांगली संधी प्राप्त झाली आणि युवकांमध्ये अशा प्रकारच्या विचारांची रुजवणुक व्हावी यदृष्टीने हा चित्रपट एक आदर्श म्हणून बघता यावा.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री यांनी रदारचे कौतुक करत त्यांचे मनोबल वाढवले. या निमित्ताने पुण्यातही फिल्म सिटी उभारण्यात यावी अशी मागणी करत त्यासाठी जागेची उपलब्धि होईल असेही सांगितले यासाठी सरकारने मदत करावी अशी मागणी केली. सिनेअभिनेत्री विद्या बालन यांनीही त्यांच्या मनोगतात सांगितले की, आजकालच्या लोकांना मोबाईल युगातून बाहेर पडून अशा प्रकारच्या चित्रपट महोत्सवात येऊन चित्रपट बघतील.
कार्यक्रमावेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेत्री विद्या बालन, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व निर्माते जानू बरवा, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे वयवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, पुणे फिल्म फाऊंडेशन चे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल हे उपस्थित होते.