मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी बऱ्याच दिवसांपासून डेटिंग करत होते. मात्र, अखेर काल सिद्धार्थ आणि कियारा यांचं लग्न जैसमेरमध्ये पार पडलं आहे. शेरशाह रिलीज झाल्यापासून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराच्या जोडीबाबत त्यांचे फॅन्स खूपच एक्साईटेड होते. शेरशाह मध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कारगिल युद्धातील हिरो कॅप्टन विजय बत्रा यांचा रोल केला होता. तर कियारा आडवाणी विक्रम बत्रा यांची गर्लफ्रेंड डिंपल चीमा च्या रोलमध्ये दिसली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं चर्चा होत असलेलं हे क्युट कपल लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांच्याही आयुष्यात 7 फेब्रुवारी 2023 हा दिवस खऱ्या अर्थानं संस्मरणीय आणि सुंदर दिवस ठरला आहे. राजस्थानमधील जैसलमेर इथल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा दणक्यात आणि उत्साही वातावरणात पार पडला.
दरम्यान, सिद्धार्थ कियारा यांनी आपल्या हळदी समारंभाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या जोडीने होळीच्या निमित्ताने चाहत्यांना वेगळ्या पद्धतीने होळीची ट्रीट दिली आहे. कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देताना त्यांच्या हळदी समारंभाचे कधीही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.
सध्या सोशल मीडियावर त्यांचे हे फोटो तुफान व्हायरल होत असून, फॅन्स देखील यावर कमेंटचा भडीमार करत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, शेअर केलेल्या फोटोंसोबत, कियाराने कॅप्शन लिहिले.. “माझ्या आणि माझ्या प्रेमाकडून तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना होळीच्या शुभेच्छा…”