मुंबई – छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘देवों के देव महादेव’ या मालिकेत भगवान शिवशंकराची भूमिका साकारणारा अभिनेता “मोहित रैना’ शनिवारी (दि. १) विवाह बंधनात अडकला आहे. मोहितने त्याची गर्लफ्रेंड आदितीशी लग्नगाठ बांधली आहे.
मोहितने लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना लग्न केल्याची माहिती दिली. नववर्षांच्या पहिल्याच दिवशी मोहितने आपल्या चाहत्यांना हे गोड सरप्राईज दिलंय. “आम्ही एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. आम्हाला आशिर्वाद द्या.! या आशयचे कॅप्शन त्याने दिले होते.
View this post on Instagram
या शाही विवाह सोहळ्यादरम्यान मोहितने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे तर आदितीने लाल रंगाचा लेहंगा घातला आहे. दोघेही अतिशय सुंदर दिसत आहेत. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला. एका युजरने तर ‘शिव-पार्वती’ असे म्हटले आहे.
View this post on Instagram
अभिनेता मोहित रैना ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ सिनेमात विकी कौशलसोबत दिसून आला होता. तसेच डायरीज 26\11 मध्ये देखील तो दिसला होता. मात्र, मोहितच्या देवों के देव महादेव मालिकेतील भूमिकेचं आजही सर्वत्र कौतूक झालं होतं.