बारामती- माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारिरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघाजणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती अमोल शिवाजी पवार, सासू ज्योती शिवाजी पवार, सासरे शिवाजी हनुमंत पवार (रा. मोतीबाग, गुणवडी), नणंद वृषाली किशोर निकम (रा. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर मयुरी अमोल पवार (रा. मोतीबाग, गुणवडी, ता. बारामती) या महिलेने याबाबत फिर्याद दाखल केली.
पोलिसांणी दिलेली माहिती अशी की, ऑगस्ट 2011 ते 1 फेब्रुवारी 2020 या कालावधीत आरोपींनी सोने, चांदी, पैशाची मागणी करत वेळोवेळी शारिकि व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.