“बिग बॉस 12′ स्पर्धक पायल रोहतगी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. विशेष म्हणजे, ती बऱ्याच वेळा आपल्या वक्तव्या आणि पोस्टमुळे वादात आणि चर्चे आली आहे. यामुळे तिचे ट्विटर अकाऊंटही बऱ्याच वेळा सस्पेंड करण्यात आले आहे. पुन्हा एकदा पायल ट्विटरवर ट्रेंड करत आहे.
पायलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती म्हणत आहे की तिचे ट्विटर अकाउंट सस्पेंड केले गेले आहे. परंतु याबद्दल तिने अधिक माहिती दिली नाही. सध्या पायल ट्विटरवर #BringBackPayal ट्रेंड करत आहे. तसेच चाहेही तिचे समर्थन करत आहेत.
दरम्यान, पायलसोबत असे प्रथमच घडले नाही. यापूर्वीही पायलने दिल्ली हिंसाचार प्रकरणात अटक झालेल्या जामिया मिलिया इस्लामियाची एमफिल विद्यार्थी सफुरा जरगरवर भाष्य केले होते.
यानंतर ट्विटरवर बराच गोंधळ उडाला आणि तिचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले. निलंबनानंतर पायलच्या चाहत्यांनीही #SupportPayalRohatgi च्या माध्यमातून जोरदार ट्विट केली. पायलचे खाते काही काळानंतर पुन्हा सुरू करण्यात आले. आता पुन्हा एकदा तिचे अकाउंट सस्पेंड करण्या आले आहे.