इस्लामाबाद : ओसामा बीन लादेन याची ओळख पटवण्यसाठी अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला (सीआयए) मदत करणाऱ्या पाकिस्तानी डॉक्टरने कारागृहात उपोषण सुरू केले आहे. त्याच्या या उपोषणाची माहिती त्याच्या कुटुंबियांनी आणि वकीलांनी सोमवारी माध्यमांना दिली.
शकील अफ्रिदी याने अबोटाबादमध्ये बनावट वैद्यकीय शिबिर घेतले. त्या आधारे ओसामा बीन लादेनला सीआयएला शोधता आले. त्यामुळे अफ्रिदीला 33 वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
मेमध्ये त्याच्यावर दहशतवाद्यांची संबंध असल्याच आरतोप ठेवण्यात आला. हा आरोप त्यांनी कायम नाकारला आहे. तरी त्यांची शिक्षा 10 वर्षांनी कमी करण्यात आली. शकील यांचे भाऊ जमील अफ्रिदी म्हणाले, तो आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळत असलेल्या अमानवी वर्तणुकीच्या निषेधार्थ त्यांनी उपोषण सुरू केले आहे. त्याच्या अटकेनंतर त्याला अनेक वर्ष वकीलाला भेटू दिले नाही. अनेक वर्ष त्याच्या कुटुंबियांना प्रशासनाकडडून त्रास देण्यात येत आहे.
पकिस्तानमधील अबोटाबादमध्ये सीआयएने ओसामा बीन लादेनची 2011मध्ये घरात घुसून हत्या केली होती.