इस्लामाबाद – पाकिस्तानमधील बलुचिस्तानमधील निरोधी पक्ष नेते आणि अन्य 9 आमदारांवर हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधीमंडळामध्ये अंदाजपत्रक सादर करण्यापूर्वी सत्तारुढ पक्षाच्या सदस्यांवर अणि अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजधानी क्वेट्टामध्ये यासंदर्भामध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. बलुचिस्तान सरकारने यासंदर्भात तक्रार दिली आहे.
विरोधी पक्ष नेते मलिक सिकंदर खान यांच्याव्यतिरिक्त अन्य 9 आमदारांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या “एफआयआर’मध्ये इतर अनेक राजकीय नेत्यांची नावेही समाविष्ट आहेत.
मात्र विरोधी पक्षांच्यावतीने सत्तारुढ पक्षांच्या काही सदस्यांविरोधातही पोलिसांकडे तक्रारी दोखल करण्यात आल्या आहेत. सत्तारुढ पक्षांच्या नेत्यांनीच विधीमंडळमध्ये बळाचा वापर केला असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.