पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा सोशल मिडियावर चर्चेत आले. यावेळी मात्र ते भलत्याच कारनाने चर्चेत आले आहेत. एका टीव्ही मुलाखतीदरम्यान इम्रान खान यांनी स्वतःबद्दल चुकीचे उदाहरण दिले. त्यांचा व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इमरान स्वत:बद्दल गाढवाचं उदाहरण देताना दिसत आहे. लोक त्यांच्या विधानाची खिल्ली उडवताना दिसून येत आहेत.
Without comment. pic.twitter.com/l0Jwpomqvp
— Hasan Zaidi (@hyzaidi) May 6, 2022
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये इम्रान खान म्हणतात, मी ब्रिटीश समाजाचा एक भाग होतो, पण मी त्यांना कधीच स्वीकारलं नाही. त्यांनी माझे खूप स्वागत केले. असे असूनही मी त्यांना माझे कधीच मानले नाही. यानंतर इम्रान खान यांनी स्वत:बद्दल एक उदाहरण दिले की, गाढवावर पट्टे लावले तर तो झेब्रा होणार नाही. गाढव गाढवच राहील. असे विधान इम्रान खान यांनी केले. त्यांची ही व्हिडिओ क्लिप स्थानिक पत्रकार हसन जैदी यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. त्यानंतर लोकांनी इम्रान खान यांची चांगलीच खिल्ली उडवीली आहे. मात्र इम्रान खान यांच्यासाठी हे नवीन नाही याआधीही अनेक वेळा त्यांनी अशाप्रकारची विधान केली आहेत ज्यामुळे ते टीकेचे धनी बनले आहेत.