पी. चिदंबरम २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय रिमांडवर

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय रिमांडवर पाठविण्यात आले आहे. याआधी गुरुवारी, त्यांना रूझ एव्हेन्यू कोर्टात सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. येथे दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर वस्तुस्थितीचा विचार करून रिमांड देणे योग्य असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने चिदंबरम यांचे कुटुंबीय व वकील यांना दररोज एक तासासाठी भेटण्याची परवानगी दिली आहे.

अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली. इतर आरोपींना समोरासमोर बसून चौकशी करावी लागेल. चिदंबरम तपासात सहकार्य करत नाहीत, असे सीबीआयचे कोर्टात म्हटले आहे. तसेच चिदंबरम यांना वारंवार कागदपत्रे मागूनही त्यांनी दिले नाहीत.

सीबीआयने उच्च न्यायालयाचा आदेश कोर्टाला दिला. सीबीआयने कोर्टाला सांगितले की, “हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला असून या प्रकरणात, अद्याप आरोपपत्र दाखल केलेले नाही. आम्ही प्री-चार्जशीट स्टेजवर आहोत. आम्ही काही कागदपत्रांची वाट पाहत आहोत. आरोपी प्रश्न टाळत आहे त्यामुळे त्यांना कस्टोडियल चौकशीची गरज आहे.”

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×