पुणे – डेक्कन जिमखाना क्लब तर्फे आयोजित मोतीलाल ओसवाल करंडक डेक्कन जिमखाना अखिल भारतीय खुल्या स्नुकर स्पर्धेत आरव संचेती, रवि सतोते, अमदीप घोडके, मद्दसर खान आणि ओंकार ताकवले या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी कामगिरी केली.
डेक्कन जिमखाना क्लबच्या स्नुकर हॉलमध्ये सुरू असलेल्या पुण्याचा १३ वर्षीय आणि महाराष्ट्र सब-ज्युनिअर (१८ वर्षाखालील) स्नुकर विजेतेपद मिळवणारा आरव संचेती याने आकाश अमराग्री याचा २८-०८, ६९-१७ असा सहज पराभव केला. आरव हा हडपसर येथील ग्लोबल इंडिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७ वी इयत्तेमध्ये शिकत आहे. मागच्या वर्षी जुलै २०२२ मध्ये मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनिअर (१८ वर्षाखालील) स्नुकर गटाचे विजेतेपद मिळवले होते. तसेच जुलै २०२२ मध्ये झालेल्या आयबीएसएफ जागतिक १७ वर्षाखालील स्नुकर अजिंक्यपद २०२३ स्पर्धेत आरव याने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.
पुण्याच्या रवि सतोते याने सलग दोन विजयांची नोंद केली. रवि याने नरेश अहीर याचा ०१-१४, ५९-२७, ४२-३५ असा पराभव केला. तसेच दुसर्या सामन्यात रवि याने दौंडच्या मद्दसर खान याचा १०-३०, ७०-३८, ४४-१७ असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. अमरदीप घोडके याने हरीशंकर शर्मा याचा ६९-२०, ४२-५७, ७५-१६ असा संघर्षपूर्ण पराभव केला.
India Open 2024 : सात्विक-चिरागची विजयी घौडदौड, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक…
मद्दसर खान याने पुण्याच्या सुनिल अलगुडे याचा २३-५२, ७४-६४, ३८-२५ असा पराभव केला. चुरशीच्या झालेल्या सामन्यात ओंकार ताकवले याने गौरव वाडे याचा १८-४३, ६४-३९, ३२-२२ असा पराभव केला.