पिंपरी, (प्रतिनिधी) – सात वर्षांच्या मुलीचा खून करून वडिलांनी आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 19) पहाटे गुरुनानक नगर, थेरगाव येथे उघडकीस आला. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत एकाला अटक करण्यात आली आहे.
सुनील कुवटे उर्फ रामराव कुयटे असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भाऊसाहेब भानुदास बेदरे (वय 42) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राजश्री बेदरे (वय 32, रा. गुरुनानक नगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे पती भाऊसाहेब आणि आरोपी सुनील यांच्यात जागेचा व्यवहार झाला होता.
सुनील याने भाऊसाहेब यांना पैसे दिले नव्हते. त्या कारणावरून भाऊसाहेब यांनी मंगळवारी पहाटे त्यांच्या सात वर्षीय मुलीचा दोरीना गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.