पुणे – इंजिनिअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली “एमएचटी-सीईटी’ या प्रवेश परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज करण्याची मुदत संपली. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत 15 एप्रिलपर्यंत आहे. या सीईटीसाठी आतापर्यंत 6 लाख 19 हजार 673 विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याची माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली. यंदा सीईटीसाठी अर्ज करण्याची संख्या सर्वाधिक आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा राज्यभरात घेतली जाते. या सीईटीसाठी दि. 8 मार्च ते 7 एप्रिल कालावधीत अर्ज करण्याची मुदत होती. याच कालावधीत आतापर्यंत सीईटीसाठी अर्ज केलेल्यांची संख्या जाहीर करण्यात आली. दरम्यान, सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या सीईटीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया संपली आहे. सध्या फक्त बॅचरल ऑफ डिझाइन, मास्टर ऑफ आर्किटेक्चर आणि हॉटेल मॅनेजमेंट, एमएड सीईटीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अडथळ्याविना व्हावी परीक्षा
राज्य सीईटी सेलकडून सीईटी घेण्याची जबाबदारी संबंधित एजन्सीकडे देण्यात आली आहे. यात एमबीए सीईटीच्या वेळी राज्यभरात सर्व्हर डाऊन आणि यंत्रणा ठप्प झाली होती. त्यामुळे काही जणांना ही सीईटी देता आली नाही. त्यासाठी पुन्हा सीईटी घेण्याची नामुष्की ओढवली. त्याचा अनुभव लक्षात घेता 6 लाखांहून अधिक विद्यार्थी एमएचटी-सीईटी देणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन करावे, अशी मागणी पालकांतून होत आहे.
7, 39, 778 एकूण विद्यार्थी नोंदणी
अर्जनिश्चिती
2,96,099
पीसीबी ग्रुपचे विद्यार्थी
3,23,574
पीसीएम ग्रुपचे विद्यार्थी