मुंबई – “फर्जंद” चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक दिगपाल लांजेकर आता इतिहासातलं एक सोनेरी पान उलगडू पाहत आहेत. युवा पिढीला आपल्या अलौकिक इतिहासाचा उलगडा व्हावा म्हणून फर्जंद नंतर, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणारा “फत्तेशिकस्त” चित्रपट लवकरच इतिहासप्रेमींच्या भेटीस येणार आहे.
दरम्यान, नुकताच ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटातील एक दमदार गाणं प्रदर्शित करण्यात आहे. ‘रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा’ असे या गाण्याचे बोल आहेत. ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. चित्रपटात अभिनेता ‘चिन्मय मांडलेकर’ छत्रपती शिवाजी महाजरांची भूमिका साकारणार आहे.