मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती समोर यांनाही ईडीने नोटीस बजावली आहे. या बजावण्यात आलेल्या नोटिशीनंतर शिवसेना आणि भाजप पक्षामध्ये शाब्दिक चकमक दिसून येत आहे. या कारवाईवर शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचं चर्चा ही रंगली आहे. याच चर्चांवर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
शिवसेना ED ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे..
हा मोर्चा मराठा आरक्षण साठी निघाला नाही ..
हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही..
हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही..
पण वैयक्तिक घरातली उणी धुनी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा!
ED नोटीसवरून नितेश राणेंनी पुन्हा सेनेला डिवचले म्हणाले,…महाराष्ट्र धर्म?— nitesh rane (@NiteshNRane) January 3, 2021
ट्विट करत नितेश राणे म्हणाले,”शिवसेना ED ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे… हा मोर्चा मराठा आरक्षण साठी निघाला नाही… हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही… हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही… पण वैयक्तिक घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा! महाराष्ट्र धर्म?,” असं म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.