नवी दिल्ली: जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली विनाचौकशी स्थानबद्ध करण्यात आले आहे. गेले अनेक महिने ते स्थानबद्धतेत आहेत. त्यांच्यावरील ही कारवाई रद्द करावी आणि त्यांची लगेच सुटका करावी या मागणीसाठी ओमर अब्दुल्लांच्या भगिनींनी कोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी या कारवाईला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यांची ही केस ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ कपिल सिब्बल हे लढवत आहेत. आज त्यांनी न्या एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाकडे ही याचिका दाखल केली असून त्यावर त्वरीत सुनावणी घ्यावी अशी विनंती त्यांनी कोर्टात केली. कोर्टाने अर्जंट लिस्टींग मध्ये ही याचिका समाविष्ट करण्यास मान्यता दिली आहे.