आॅकलंड : भारतीय संघाला न्यूझीलंडविरूध्दच्या दुस-या एकदिवसीय सामन्यातील पराभवाने मालिकाही गमवावी लागली. पराभवानंतरही काही गोष्टी सकारात्मक घडल्या. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि कपिल देव या महान खेळाडूंच्या कामगिरीला मागे टाकले.
दुस-या एकदिवसीय लढतीत जडेजाने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ७३ चेंडूत ५५ धावा केल्या. यासह जडेजाने भारतीय संघाकडून सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत सर्वाधिक अर्धशतके फटकाविण्याची कामगिरी करत धोनी व कपिल देव यांची कामगिरी मागे टाकली.
A crucial FIFTY by @imjadeja.
Will he convert it into a match-winning knock?#NZvIND pic.twitter.com/iEO0Gjzm6z
— BCCI (@BCCI) February 8, 2020
दरम्यान, महेंद्रसिंग धोनी व कपिल देव यांनी सातव्या क्रमांकावर प्रत्येकी ६ अर्धशतके नोंदवली आहेत. जडेजाने सातवे अर्धशतक साकार करत या दोन्ही भारतीय क्रिकेटपटूनां मागे टाकले आहे.