आळंदी – केळगाव ग्रामपंचायत, चऱ्होली ग्रामपंचायत व आळंदी नगरपरिषद यांचे अंतर्गत माझी वसुंधरा स्वच्छता अभियान मोहिमेच्या माध्यमातून आळंदी जनहित फाऊंडेशन यांच्या प्रेरणेने आळंदी स्वच्छता जनजागृती अभियान दुर्गजागर प्रतिष्ठान गडकिल्ले संवर्धन महाराष्ट्र या संस्थेसह विविध सेवाभावी संस्थाच्या सहकार्याने रविवारी उत्साहात आयोजित करण्यात आले. या स्वच्छता अभियानात आळंदी परिसरातील विविध सेवाभावी कार्यकर्ते, संस्था यांचा अभियान शपथ व स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग मिळाला.
आळंदी येथील इंद्रायणी कॅन्सर रुग्णालयाचे परिसरातील स्वच्छता करण्याची मोहीम दर रविवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत होते. या अंतर्गत या रविवारी (दि. 6) या मोहिमेचे आयोजन आळंदी चाकण रस्त्या लगत असलेल्या इंद्रायणी हॉस्पिटल जवळील दगडी पूल, बाह्यवळण मार्ग येथे आयोजित करण्यात आले. कुबेर गंगा ओढ्यालगत असलेल्या बाह्यवळण मार्गाचे दुतर्फा ही स्वच्छता मोहीम उत्स्फूर्त पणे राबविण्यात आली.