हॅमिल्टन : श्रेयस अय्यरचे शानदार शतक, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३४८ धावांचे आव्हान ठेवले आहे.
Innings Break!
Century from @ShreyasIyer15 and fifties from @imVkohli & @klrahul11 power #TeamIndia to a total of 347/4 after 50 overs.
Scorecard – https://t.co/ewSrnE8I9m #NZvIND pic.twitter.com/znZEa1vMHq
— BCCI (@BCCI) February 5, 2020
न्यूझीलंडचा कर्णधार टाॅम लॅथम याने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले. त्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ४ बाद ३४७ धावा केल्या. भारतीय संघाकडून सलामीवीर पृथ्वी शाॅने २०(२१) आणि मयंक अग्रवालने ३२(३१) धावांची खेळी केली. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने तिस-या विकेटसाठी १०२ धावा जोडल्या. विराटने ६३ चेंडूत ६ चौकारासह ५१ धावा केल्या.
FIFTY!
A composed 58th ODI half-century for @imVkohli 👏👏
Live – https://t.co/ewSrnE8I9m #NZvIND pic.twitter.com/dGM4qw8dnQ
— BCCI (@BCCI) February 5, 2020
त्यानंतर श्रेयस आणि राहुलने डावाची सूत्रे हाती घेत चौथ्या विकेटसाठी १३६ धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या तीनशेच्या जवळपास नेली. श्रेयस अय्यरने कारकिर्दीतील पहिले शतक साजरे करताना १०७ चेंडूत ११ चौकार व १ षटकारासह १०३ धावांची खेळी केली.
Here it is!
Maiden ODI 💯 for @ShreyasIyer15 💥💥#NZvIND pic.twitter.com/JgEqaJH0BW
— BCCI (@BCCI) February 5, 2020
त्यानंतर राहुल आणि केदार जाधवने ५ व्या विकेटसाठी शेवटच्या २७ चेंडूत नाबाद ५५ धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या ५० षटकांत ३४७ पर्यंत नेली.
KL Rahul joins the party. Brings up his 7th ODI FIFTY off 41 deliveries.
Live – https://t.co/ewSrnE8I9m #NZvIND pic.twitter.com/aq9AvO5rAJ
— BCCI (@BCCI) February 5, 2020
लोकेश राहुलने ६४ चेंडूत ३ चौकार व ६ षटकारासह नाबाद ८८ आणि केदार जाधवने १५ चेंडूत ३ चौकार व १ षटकारासह २६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टिम साउदीने २ तर काॅलिन डी ग्रैंडहोम आणि ईश सोढीने प्रत्येकी १ गडी बाद केला.