मुंबई – राजा रवी वर्मा यांना भारतातले पहिले आधुनिक चित्रकार म्हटल्यास वावगं ठरणार नाही. भावभावना, सौंदर्य आणि निसर्गाची सुरेख मांडणी करत साकारण्यात आलेले राजा रवी वर्मा यांची चित्र म्हणजे एक अनमोल खजिना आहे.
दरम्यान, त्यांच्या या कलाकृतीला प्रसिद्ध फोटोग्राफर जी. व्यंकट राम यांनी फोटोग्राफीच्या माध्यमातून रिक्रिएट केले आहे. यामध्ये त्यांना दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी, श्रृती हसन, रम्या कृष्णन, लिजी लक्ष्मी आणि अभिनेत्री नाडिया यांची साथ लाभली. २०२० या चालू वर्षीच्या कॅलेंडरसाठी त्यांनी ही संकल्पना अंमलात आणली आहे.