पिंपरी -निवडणुका जवळ आल्याने की त्या अनुषंगाने वेगवेगळे व्यवसाय आणि कोर्सेस पुढे येतात. यापूर्वी नेता कसे बनावे, नेत्यांचे वक्तृत्त्व आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण दिले जात होते. परंतु आता थेट कार्यकर्त्यांना टेक्नोसेव्ही बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
काही संस्था राजकीय मंडळींशी संपर्क साधून त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचा आग्रह करत आहेत. कार्यकर्ते आपल्या प्रचारासाठी वेल ट्रेंड व्हावेत यासाठी नेते मंडळी अशा प्रकारच्या प्रशिक्षणामध्ये रस दाखवत आहेत. परंतु कार्यकर्ते मात्र एवढा वेळ देण्यास आणि शिकण्यासाठी तयार नसल्याचे दिसून येत आहे. यावर नेते मंडळी त्यांना हे प्रशिक्षण कसे फायद्याचे आहे, हे समजावून सांगत आहेत. सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग असून प्रत्येक हातात मोबाइल आहे.
प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचे साधनच त्या मतदाराच्या हातात असलेला मोबाइल आहे. यामुळे चांगल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सऍप, यूट्यूब अशा समाजमाध्यमांवर आपल्या पोस्ट्स झळकाविणे आणि त्या जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचविणे आता प्रत्येक नेत्यासाठी अत्यावश्यक झाले आहे. काही बड्या नेत्यांनी यासाठी थेट प्रोफेशनल्सच्या टीमला निवडणुकीपर्यंतचे कॉन्ट्रक्ट केले आहे. काही नेते त्यांच्याकडे असलेल्या कार्यकर्त्यांनाच ट्रेनिंग देऊन तयार करुन घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
काय शिकविले जाते
या प्रशिक्षण शिबिरांमध्ये तीन ते दहा हजार प्रति व्यक्ती शुल्क आकारुन प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्स प, यूट्यूब माध्यम सोप्या पद्धतीने हाताळणे.ग्राफ़िक डिज़ाइन बनविणे, ऍनिमेशन वीडियो बनविणे.ल्क एसएमएस, बल्क ई-मेल, बल्क व्हॉट्स ऍप मार्केटिंग, कमी खर्चात वेबसाइट बनविणे, फ्री होस्टिंग, फेसबुक पेज, स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट.बनविणे, अपडेट करणे. कटेंट मार्केटिंग, सोशल मीडियावर सोप्या पद्धतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे, तसेच आपल्या नेत्यासाठी ब्लॉगिंग, इमेज एडिटिंग, सर्च इंजिन ऑप्टीमाइजेशन असे प्रशिक्षण दिले जात आहे.