आता व्हॉट्‌स ऍप स्टेटस फेसबूकवर शेअर करता येणार

नवी दिल्ली – व्हॉट्‌सऍपचे स्टेटस फिचर खूप प्रसिद्ध झाले असून रोज नविन फोटो शेरो शायरी अथवा शुभ प्रभात, शुभ रात्रीचे मेसेज स्टेटस म्हणुन शेअर केले जाते. त्यामुळे या हे स्टेटस जास्तीत जास्त लोकांनी पहावे अशी सर्वांची इच्छा असते.

आता लोकांची ही इच्छा लवकरच पुर्ण होणार असून आता लवकरच व्हॉट्‌सऍप स्टेटससोबत आणखी एक अन्य फिचर जोडले जाणार आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही व्हॉट्‌सऍप स्टेटस फेसबुकसह अन्य ऍपवरही शेअर करू शकणार आहात. व्हॉट्‌सऍपचे हे फिचर सध्या व्हॉट्‌सऍप बीटा व्हेरिएंटवर उपलब्ध आहे.

व्हॉट्‌सऍप स्टेटस फेसबुकवर शेअर करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी फेसबुक किंवा फेसबुक लाइट ऍप आपल्या फोनवर डाऊनलोड करणे गरजेचे असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.