जगभरात आता करोना विषाणूने एक साथीचा रोग बनला आहे. भारतातही या साथीच्या रोगाचे अनेक रुग्ण आढळले आहेत. तसेच अनेक देशांमध्ये राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्यात आली आहे. एकीकडे सरकारे याची चिंता करीत असताना दुसरीकडे हिंदी चित्रपटसृष्टीने त्यावर चित्रपट बनवण्याची तयारी केली आहे.
बाजीराव मस्तानी, तनु वेड्स मनु रिटर्न्स, बदलापूर, बजरंगी भाईजान यासारख्या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या इरोज इंटरनेशनल या कंपनीने “कोरोना प्यार है’ नावाच्या चित्रपटाची नोंदणी केली आहे. कोविड-19 वर नोंदणीकृत हा पहिला चित्रपट ठरला आहे.
सन 2000 मध्ये हृतिक रोशन आणि अमिषा पटेल यांचा कहो ना प्यार है हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याने बॉक्स ऑफिसवर यश मिळवीत ब्लॉकबस्टरमध्ये नाव नोंदविले होते. आता कोरोना प्यार हैफ हेच नाव असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या वृत्ताला खुद्द निर्माता क्रिशिका लुल्ला यांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, सध्या या चित्रपटाची कथा तयार करण्याचे काम सुरू आहे. जेव्हा सर्व स्थिती सामान्य होईल, तेव्हा आम्ही हा प्रकल्प सुरू करणार आहे. या चित्रपटात कोण-कोणते कलाकार असतील याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.