मुंबई – पुढील हंगामात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत दोन नव्या संघांचा समावेश होणार आहे. या स्पर्धेतील नवीन संघाच्या खरेदीसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि अभिनेता रणवीर सिंह बिडींग करणार आहे. त्यामुळे आता शाहरुख खान आणि प्रिती झिंटा यांच्या व्यतिरिक्त आता दीपिका-रणवीर यांचीही टीम असणार आहे.
संघ खरेदीसाठीची बिडींग 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यामध्ये दोन सर्वात मोठ्या बीडर्सला आयपीएल संघ मिळवता येणार आहे.
आयपीएलमधील शाहरुख आणि जुही चावला यांच्या संघाचं नाव कोलकाता नाईट रायडर्स आहे. तर प्रिती झिंटाच्या संघाचं नाव किंग्स इलेव्हन पंजाब आहे. दीपिका-रणवीर कोणता संघ खरेदी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोघांनाही स्पोर्टची विशेष आवड आहे. दीपिकाचे वडील बॅडमिंटन चॅम्पियन होते. तर रणवीर खुद्द दोन मोठ्या स्पर्धांचा भाग आहे.
संघ खरेदी करण्याच्या स्पर्धेत केवळ दीपिका-रणवीरच नसून अडानी ग्रुप, ग्लेजर फॅमिली, ऑरोबिंदो फार्मा, टॉरेंट फार्मा, आरपी-संजीब गोयंका ग्रुप, जिंदल स्टील, हिंदुस्थान टाईम्स मिडीया हे देखील आहेत.