रणवीर-दीपिकाच्या लग्नाचा वाढदिवस अगदी गुपचूप

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण या बॉलिवूडच्या सर्वात फेव्हरेट जोडीच्या लग्नाचा वाढदिवस उद्या (गुरुवारी) आहे. आपली “वेडिंग ऍनिव्हर्सरी’ साजरी करण्यासाठी या दोघांनी खूप प्लॅन केले आहेत.

मात्र आपल्या “वेडिंग ऍनिव्हर्सरी’चा सगळा कार्यक्रम अगदी खासगीपणे एन्जॉय करायचे या दोघांनी ठरवले आहे. त्यांनी लग्नाबाबतही हीच खबरदारी बाळगली होती. लग्नाच्या वाढदिवसापूर्वी हे दोघेजण तिरुपतीला दर्शनासाठी जाणार आहेत.

त्यानंतर 15 नोव्हेंबरला हे दोघेजण सुवर्णमंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. याच दिवशी ते लगेचच मुंबईला परत येणार आहेत. याशिवाय आपले कुटुंबीय आणि काही निवडक मित्रपरिवारासह ते आपली ऍनिव्हर्सरी एन्जॉय करणार आहेत.

कोणताही खास कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित केला गेलेला नाही. लग्नापूर्वी हे दोघे तब्बल 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी कधीच आपल्या रिलेशनशीपबाबत उघडपणे व्याच्यता केलेली नव्हती.

इटलीमध्ये केवळ नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीमध्ये त्यांचे लग्न झाले होते. ज्या प्रमाणे त्यांचे लग्न सगळ्या गजबजाटापासून दूर झाले होते. त्याच प्रमाणे लग्नाचा वाढदिवसही अगदी गुपचूप आणि गजबजाटापासून दूर राहून एन्जॉय केला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.