रणवीर-दीपिकाचा भांगडा डान्स पाहिला का?

निर्माता-दिग्दर्शक कबीर खान यांचा 1983 मधील विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणा-या भारतीय संघावर आधारित ’83’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर सिंग या चित्रपटामध्ये भारतीय संघांचे माजी ‘कर्णधार कपिल’ देव यांची भूमिका साकारत आहे. तर, दुरीकडे अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील या चित्रपटात रणवीर बरोबर दिसून येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. या चित्रपटातील रणवीरच्या लुक्सपासून बॅटिंग स्टाईलपर्यंत घेतलेल्या मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नुकतीच  83 चित्रपटाची रॅपअप पार्टी साजरी झाली. या पार्टीमध्ये रणवीर-दीपिकाने पंजाबी गाण्यावर ताल धरला. यावेळी दोघांचेही लूक एकमेकांना सारखे होते. तसेच रणवीर-दीपिकाने ग्रीन कर्पेटवर क्रिकेट खेळण्याची अॅक्टिंगही केली. या पार्टीतील व्हिडीओ आता चांगलेच व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

#ranveersingh and #deepikapadukone arrive for #83rd wrap party tonight #viralbayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

या चित्रपटात रणवीर सिंहशिवाय साकिब सलीम, आर. बद्री, हार्डी संधू, चिराग पाटील, पंकज त्रिपाठी, अम्मी विर्क आणि साहिल खट्टर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.