नवी दिल्ली – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेत्री यामी गौतम हिला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. तिच्यावर परकी चलन व्यवस्थापन कायद्याचा (फेमा) भंग केल्याचा आरोप आहे.
यामीला 7 जुलैला ईडीच्या मुंबईतील कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. बॅंक खात्यात दीड कोटी रुपये जमा करण्यात आल्याशी संबंधित ते प्रकरण आहे.
यामीला चौकशीसाठी याआधीही समन्स बजावण्यात आले होते. मात्र, ती हजर न राहिल्याने पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे. यामी मागील महिन्यातच दिग्दर्शक आदित्य धर याच्याशी विवाहबद्ध झाली.
विविध हिंदी, तमीळ आणि तेलगू चित्रपटांत ती झळकली आहे. विकी डोनर, बदलापूर, उरी यांसारख्या गाजलेल्या बॉलीवूड चित्रपटांत तिने भूमिका केल्या आहेत.