बॉलीवूड अभिनेता ईशान खट्टर सध्या न्यू ईयर सेलिब्रेट करण्यासाठी मालदीवला गेला आहे. तसेच तो त्याच्या नवीन चित्रपटमुळे चर्चेत आला आहे. ईशानने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 2018मध्ये धर्मा प्रॉडक्शनच्या “धडक’ चित्रपटातून केली होती. या चित्रपटानंतर ईशान आणि अनन्या पांडेची जोडी “खाली पिली’मध्ये दिसली होती. ईशान खट्टर सध्या हॉरर-कॉमेडी “फोन भूत’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ईशान खट्टरकडे “पिप्पा’ हा चित्रपटदेखील आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात वॉर ड्रामा असून ईशान यात आर्मी ऑफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान, ईशान खट्टर पुन्हा एकदा धर्मा प्रोडक्शनसोबत काम करणार असून त्याने आणखी एक चित्रपट साइन केला आहे. रिपोर्टसनुसार ईशान खट्टरने धर्मा प्रॉडक्शनचा आगामी थ्रिलर चित्रपट स्वीकारला आहे. “धडक’नंतर ईशानचा हा धर्मासोबतचा दुसरा चित्रपट असेल.
View this post on Instagram
या नवीन चित्रपटामध्ये बुलबुल आणि लैला मजनू फेम अभिनेत्री तृप्ती दिमरी मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभूती कश्यप करणार आहेत. ज्यांनी नुकतीच आयुष्मान खुराणासमवेत “डॉक्टर जी’ची घोषणा केली आहे. तसेच धर्माचा हा नवीन चित्रपट “प्यार का पंचनामा’ आणि “लस्ट स्टोरीज’ फेम सुमित सक्सेना यांनी लिहिलेला आहे. हा चित्रपट या वर्षाअखेर प्रदर्शित होणार आहे.