बिटकॉईनला चलन म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव नाही – अर्थमंत्री

नवी दिल्ली – भारतात बिटकॉईनला चलन म्हणून मान्यता देण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधिन नाही असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

लोकसभेत दिलेल्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. भारतात बिटकॉईनद्वारे किती व्यवहार झाले याचा कोणताही डाटा सरकारकडे उपलब्ध नाही असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

बिटकॉइॅन ही एक क्रिप्टो करन्सी असून ती सन 2008 मध्ये काही अज्ञात प्रोग्रामरनी बाजारात आणली आहे. हा एक डिजीटल करन्सीचा प्रकार आहे. दरम्यान क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण आणणारे एक विधेयक सरकारतर्फे संसदेच्या चालू अधिवेशनातच आणले जाणार आहे.

दरम्यान लोकसभेतील दुसऱ्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांनी एप्रिल ते सप्टेंबर या अवधीत 2 लाख 29 हजार कोटी रूपयांचा भांडवली खर्च केला आहे. चालू आर्थिक वर्षात एकूण 5 लाख 54 हजार कोटींचा भांडवली खर्च होईल असा अर्थसंकल्पीय अंदाज होता.

त्यापैकी 41 टक्के रक्कम आत्तापर्यंत खर्ची पडली आहे असे त्यांनी नमूद केले. महागाईच्या संबंधात विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की देशातील चलनवाढ आणि महागाईच्या स्थितीवर सरकार सातत्याने लक्ष ठेऊन असून त्यावर आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या जातात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.