रजनी पाटील यांच्यासह अन्य चार सदस्यांनी घेतली राज्यसभा सदस्यपदाची शपथ

नवी दिल्ली  – महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या सदस्य रजनी पाटील यांच्यासह अन्य चार जणांनी आज राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. अध्यक्ष व्यंकैय्या नायडू यांनी त्यांना शपथ दिली. रजनी पाटील यांनी मराठीतून शपथ घेतली.

राजीव सातव यांचे निधन झाल्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत त्यां बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या खेरीज आज द्रमुक पक्षाचे कनिमोळी एनव्हीएन सोमू, केआरएन राजेश, आणि एमएम अब्दुल्ल यांनीहीं सदस्यत्वाची शपथ घेतली.

कनिमोळी या माजी केंद्रीय मंत्री एनव्हीएन सोमू यांच्या कन्या आहेत. तर केआरएन राजेशकुमार हे द्रमुकच्या युवाशाखेचे पदाधिकारी आहेत. या तीन सदस्यांमुळे द्रमुक पक्षाची राज्यसभेतील सदस्य संख्या आता दहा झाली आहे. गोव्यातील नेते लुईझिन्हो फालेरिओ यांना तृणमुल कॉंग्रेसने पश्‍चिम बंगाल मधून राज्यसभेवर पाठवले आहे. त्यांनीही आज शपथ घेतली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.