Voter ID – कामानिमित्त अनेक नागरिक आपल्या गावापासून दूर राहतात. काहीवेळा ते तिथेच स्थायिक होतात. त्यामुळे मतदानासाठी त्यांना गावी जाणे शक्य होत नाही. तर अनेकांना आपल्या मतदान ओळखपत्रातील पत्ता बदलण्याची इच्छा असते. तुम्हालाही तुमच्या मतदान ओळखपत्रातील पत्ता बदलायचा असेल तर तुम्ही घरीच ही प्रक्रिया करू शकता.
अशी आहे प्रक्रिया..
– सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर https://www.nvsp.in लॉग इन किंवा नोंदणी करावी लागेल.
– यानंतर मतदार यादीतील नोंदी सुधारणे (Correction of entries in electoral roll) या विभागावर क्लिक करा.
– नवीन पेज उघडल्यावर तुम्हाला फॉर्म 8 दिसेल, त्यावर क्लिक करा.
– आता मतदार ओळखपत्रात दुरुस्तीचा पर्याय दिसेल.
-येथे विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरा आणि तुमचा पत्ता देखील भरा.
– माहिती दिल्यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील. ज्यात पत्ता पुरावा म्हणून आधार, वाहन परवाना समाविष्ट आहे.
– त्यानंतर तुम्हाला जी माहिती बदलायची आहे ती निवडायची आहे. जर त्यात नाव असेल तर नावाचा टॅब निवडा आणि आणखी काही असल्यास त्याचा टॅब निवडा.
– नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल अॅड्रेस सबमिट करावा लागेल.
– त्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा. व्हेरीफिकेशन केल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला नवीन मतदार ओळखपत्र पाठवले जाईल.