मुंबई – अंमली पदार्थविरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने एका नायजेरियन ड्रग्ज तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहे. या कारवाईत त्याच्याकडून तब्बल 3 कोटी 90 लाख रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई करण्यात आल्याचे अमली पदार्थविरोधी पथकाचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार ड्रग्ज तस्करीसाठी मुंबईत एक नायजेरियन नागरिक येणार असल्याची माहिती एनसीबी विभागाला मिळाली. ही गुप्त माहिती मिळताच एनसीबी विभागाने सापळा रचला. त्यानुसार एनसीबीने कारवाई करत नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. या कारवाईत त्याच्याकडून तब्बल 1 किलो 300 ग्रॅन कोकेन ड्रग्स जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सचे मूल्य तब्बल 3 कोटी 90 लाख रुपये आहे.
सध्या अटक करण्यात आलेला नायजेरियन नागरिक अमली पदार्थविरोधी पथकाच्या ताब्यात असून त्याची सखोल चौकशी केली जात आहे. त्याच्या अटकेनंतर मुंबईमधील ड्रग्स तस्करीचे मोठे जाळे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.