पारादीप – ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यातील पारादीप बंदरावर एका जहाजातून तब्बल 220 कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी व्हिएतनाम येथील एका क्रू सदस्याला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती संबंधित अधि–यांनी दिली.
सीमा शुल्क आयुक्तालयाने सांगितले की त्यांनी गुप्तचर माहितीच्या आधारे मध्यरात्रीच्या सुमारास जहाजाची झडती घेतली आणि त्यात कोकेनची पाकिटे सापडली.
एमव्ही देबी नावाच्या पनामा-नोंदणीकृत मालवाहू जहाजाने इजिप्तमधून प्रवास सुरू केला आणि इंडोनेशियातील ग्रेसिक बंदरमार्गे येथे पोहोचले. येथून स्टील प्लेट्स घेऊन ते डेन्मार्कला रवाना होणार होते. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे २०० कोटी ते २२० कोटी रुपये आहे, राज्य सीमा शुल्क आयुक्त माधव चंद्र मिश्रा यांनी पीटीआयला सांगितले.